Gayatri Laxmikant MaliMPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक, क्लासचालकही ताब्यात
MPSCच्या औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या पेपरफुटी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत MPSCच्या तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक केली आहे. याप्रकरणी संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली असून फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची किंवा परीक्षा शुल्क भरण्याची गरज नसणार आहे.


















