कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वाढत्या वापरामुळे जगभरातील नोकऱ्यांवर संकट निर्माण होत आहे. ब्रिटनमधील बार्कलेज बँकेने 2026 अखेरपर्यंत तब्बल 5,000 पदे कमी करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, बँकेने तिसऱ्या तिमाहीत 2.3 अब्ज पाउंडचा नफा कमावला असतानाही हा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे अॅमेझॉननेही जवळपास 1,000 कर्मचाऱ्यांची कपात केल्याने जागतिक रोजगार क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला संघाने 4×400 मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक पटकावले आहे. किरण, मचेत्तिरा पूवम्मा, प्राची आणि विथ्या रामराज यांनी अवघ्या 3:29.69 मिनिटांत शर्यत पूर्ण करत बहरीन आणि चीनला मागे टाकले. या विजयासह भारताने स्पर्धेतील सहावे आणि ॲथलेटिक्समधील पहिले सुवर्णपदक जिंकले आहे.
आशियाई खेळ 2026 मध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. विथ्या रामराजने महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकत पीटी उषा यांचा 42 वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडला. तर गुलवीर सिंगने पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावत या स्पर्धेतील आपले दुसरे पदक जिंकले.
नेपाळमध्ये आलेल्या भीषण जलप्रलयामुळे मोठी जीवितहानी झाली असून शेकडो जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील पर्यटकही या दुर्घटनेत अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारशी समन्वय साधून बचावकार्य सुरू असल्याची माहिती दिली असून, नागरिकांनी नेपाळमध्ये गेलेल्या आपल्या नातेवाईकांबाबत माहिती प्रशासनाला देण्याचं आवाहन केलं आहे.
AI आणि सेमीकंडक्टर उद्योगाच्या जोरावर तैवानच्या अर्थव्यवस्थेने विक्रमी वाढ नोंदवली आहे. या आर्थिक प्रगतीचा थेट फायदा नागरिकांना देण्यासाठी तैवान सरकारने 2027 मध्ये प्रत्येक नागरिकाला सुमारे 26 हजार रुपयांची रोख रक्कम देण्याची योजना आखली आहे. मात्र, या निर्णयामागे सरकारचा जनहिताचा हेतू आहे की राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न, यावरून आता वाद सुरू झाला आहे.
कोरोनानंतर आता आणखी एका जीवघेण्या संसर्गजन्य आजाराने जगाची चिंता वाढवली आहे. आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये Ebolaचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून WHOने परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. 3,600हून अधिक संशयित आणि संक्रमित रुग्णांची नोंद झाली असून 1,500 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मृत्यूदर सुमारे 44 टक्के असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. संसर्गाची साखळी अद्याप सुरू असल्याने परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेत झालेल्या तिसऱ्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (NAFA) मराठी फिल्म फेस्टिव्हल 2026 मध्ये ‘कॉफी विथ कौशिक’ या कार्यक्रमात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सिनेसृष्टी आणि जातव्यवस्थेवर परखड भाष्य केलं. हिंदी चित्रपटसृष्टीने अनेकदा जात लपवून अमीर-गरीब किंवा इतर कारणांच्या माध्यमातून कथा मांडल्या, असा दावा त्यांनी केला. “लोक आडनाव लपवलं तरी त्याची जात शोधून काढतात,” असं म्हणत मंजुळेंनी समाजातील जात ओळखण्याच्या मानसिकतेवरही भाष्य केलं.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी टीम इंडियाच्या प्लेइंग-11मध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. सराव सामन्यात अपेक्षित कामगिरी न करणाऱ्या आकिब नबी, प्रसिद्ध कृष्णा आणि ध्रुव जुरेल यांच्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता गॉल कसोटीत कर्णधार शुभमन गिल आणि टीम मॅनेजमेंट कोणता निर्णय घेणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
फेसबुकवर रविवारी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने भारतासह जगभरातील अनेक यूजर्सना लॉगिन आणि वापर करताना अडचणी आल्या. अनेकांना "Account Temporarily Unavailable" असा संदेश दिसत होता. काही वेळासाठी फेसबुक सेवा विस्कळीत झाली होती. कंपनीकडून या समस्येचे कारण स्पष्ट करण्यात आले नसले तरी तांत्रिक टीमने बिघाड दूर करण्यासाठी काम सुरू केले.
जन्मानंतर काही दिवसांतच आयुष्याने कठोर परीक्षा घेतली , तीच मुलगी पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरणार आहे, याची कल्पनाही कोणाला नव्हती. Lisa Sthalekar यांची जीवनकथा ही संघर्ष, जिद्द आणि यशाचा अद्वितीय प्रवास मानली जाते.